बिग बॉस विजेत सुरज चव्हाण याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकून त्याने खेड्यातील मुलगा काय करु शकतो हे दाखवून दिलं आहे. दरम्यान सुरज चव्हाणला शाहिर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी त्याने 'लय भारी वाटतंय' अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याचा पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.