
Marathi Entertainment News : 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची आडारकरने ६ डिसेंबर २०२३ ला अभिनेता पियुष रानडेशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाने अनेकांना धक्का बसला तर त्यांना ट्रोलही केलं गेलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरुची या ट्रोलिंगवर आणि पियुषच्या दोन्ही घटस्फोटांवर व्यक्त झाली. काय म्हणाली सुरुची जाणून घेऊया.