
चार वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक मृत्यूमुळं मोठी खळबळ माजली होती. या हायप्रोफाईल केसमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर राजकारणही पाहायला मिळालं होतं. पण आता या केसचा तपास करणाऱ्या सीबीआयनं या प्रकरणात कुठलाही वेगळा पुरावा न मिळाल्यानं आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पीटीआयनं याबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.