हिंदी सिनेमातील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक मिथुन चक्रवर्तीचा आज 74 वा वाढदिवस आहे. आपल्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखले जाणाऱ्या मिथुनदा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलय. 'डिस्को डान्सर'सारख्या चित्रपटातून त्यांनी बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली. आज ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. मात्र त्यांच्या करिअरमधील एक किस्सा अजूनही चाहत्यांच्या मनात आहे, तो म्हणजे सुष्मिता सेनसोबतच्या वादाचा.