Adishakti: दुर्जनांचा नाश करायला येतेय 'आदिशक्ती'; नव्या मालिकेत सुयश साकारतोय खास भूमिका

Adishakti: सुयशने आजवर वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलंय आणि आता तो नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
दुर्जनांचा नाश करायला येतेय 'आदिशक्ती'; नव्या मालिकेत सुयश साकारतोय खास भूमिका
Adishaktiesakal
Updated on

Suyash Tilak: अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेतील भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. सुयशने आजवर वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलंय आणि आता तो नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

आदिशक्ती मालिकेत काम करणार सुयश

सुयश आता आदिशक्ती या नवीन मालिकेत काम करणार आहे. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत त्याने ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने शेअर केलेला हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. आपलीच मुलगी आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरेल हे समजल्यावर स्वतःच्या पोटच्या पोरीच्या जीवावर उठलेल्या वडिलांची भूमिका सुयश साकारणार आहे. सुयश स्वतःच्या मुलीला मारण्यासाठी मारेकरी पाठवतो आणि त्याची मुलगी अदिती देवीच्या गोंधळात रममाण असते. देवीच्या कृपेने तो मारेकरी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि अदिती प्रत्यक्ष आदिशक्तीच असल्याचं दिसतं असं प्रोमो मध्ये दाखवण्यात आलंय.

प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत सुयशच कौतुक केलं. सुयश पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या आधी त्याने सोनी मराठीवरील जीवाची होतीया काहिली या मालिकेतही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्यानंतर बऱ्याच काळाने तो पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सुयश सोबत अंबरीश देशपांडे, सुश्रुत मंकणी, पल्लवी अजय आणि बालकलाकार सावी केळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ६ मे पासून सुयशची ही नवी मालिका सुरु होणार असून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना ही मालिका पाहता येईल.

पाहा प्रोमो:

सुयशच्या अबोली मालिकेला मिळाली प्रेक्षकांची पसंती

आदिशक्ती या मालिकेआधी सुयशने अबोली या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्याने सचित राजे ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी सुयशने 15 वेगवेगळी रूपं साकारली. कधी वृद्धाच्या रुपात तर कधी स्त्रीवेशात अशा लूकमध्ये तो या मालिकेत दिसला. सुयशच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com