

MUMBAI PUNE MUMBAI BEHIND THE SCENE
esakal
मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र जुन्या चित्रपटांची जादू काहीतरी वेगळीच होती. जुने चित्रपट पाहताना प्रेक्षकांना मुळीच कंटाळा येत नाही. हे सिनेमे ते कधीही पाहू शकतात. असाच एक चित्रपट म्हणजे २०१० साली आलेला 'मुंबई पुणे मुंबई'. या चित्रपटातली गाणी, डायलॉग, कथा आणि कलाकार सगळंच प्रेक्षकांना आवडलं. आजही हा सिनेमा मराठीतला कल्ट सिनेमा मानला जातो. मात्र या चित्रपटात एक सीन आहे जो खऱ्या आयुष्यात जसा घडला तसाच घेतला गेलाय. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी याबद्दल सांगितलंय.