SWAPNIL JOSHI VIRAL VIDEO
Esakal
LAGNAPANCHAMI THEATRE PERFORMANCE VIRAL VIDEO: महाराष्ट्रात सिनेमांपेक्षा प्रेक्षकांचा कल हा नाटक पाहण्याचा असतो. नाटकाचे अनेक शो हाऊसफूल असतात. मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार सिनेमाऐवजी नाटकाकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. नाटकात सगळं प्रेक्षकांच्या समोर लाईव्ह असतं. यामुळे कलाकार नाटकासाठी खुप मेहनत घेतात. परंतु प्रेक्षकांमधून कोणाचा आवाज आला, कोणाचा फोन वाजला, कोणाचं बाळ रडलं तर कलाकारांना नाटक करताना अडथळा होतो. असाच काहीसा किस्सा स्वप्नील जोशीसोबत लग्नपंचमी या नाटकाच्या प्रयोगावेळी घडला.