

swati chitnis
esakal
मोठ्या पडद्यावर खलनायक म्हणून दिसणारे अमरीश पुरी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अजरामर अशा भूमिका साकारल्या. त्यांचा 'जा सिमरन जा' हा डायलॉग असो किंवा त्यांचा मोगॅम्बो असो, त्यांनी आपल्या भारदस्त आवाजानेच सगळ्यांना पाणी पाजलंय. मात्र वरून रागीट दिसणारे अमरीश पुरी खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय हळवे होते. मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं आहे. यात त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा यादेखील सांगितला.