'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही विनोदी मालिका प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडते. या मालिकेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेतील अनेक पात्रांमध्ये 'जेठालाल' आणि 'बबीता जी' यांच्यातील गोड नातं प्रेक्षकांना विशेष भावतं. मात्र सध्या सुरू असलेल्या कथेत ही आवडती जोडी दिसत नसल्यामुळे चाहते अस्वस्थ झालेत.