
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या 'बाहुबली' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलेलं. २०१५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला. भलंमोठं राज्य आणि त्याचा राजपुत्र, सत्तेसाठीची लढाई यासगळ्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मात्र या चित्रपटातील एका सीनवरून बराच वाद झाला होता. या सीनमध्ये प्रभास तमन्नाचे कपडे काढून तिचा पानाफुलांच्या रंगाने मेकअप करतो. या सीनवर 'अवंतिकाचा बलात्कार' नावाचा लेखही प्रकाशित झाला होता. आता एका मुलाखतीत तमन्नाने त्यावर भाष्य केलंय.