

Taylor Swift Gets DPIFF Awards 2026; Fans Ask 'Does She Know?'
esakal
International Artist of the Year at DPIFF Awards 2026: जागतिक संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका आणि गीतकार Taylor Swift हिचे नाव Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2026 च्या विजेत्यांच्या यादीत आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. आयोजकांनी शुक्रवारी, 20 नोव्हेंबर 2026 ला अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून तिची 'International Artist of the Year' या श्रेणीसाठी निवड झाल्याची माहिती दिली.
संगीत निर्मिती, गीतलेखन, थेट सादरीकरण आणि जागतिक सांस्कृतिक प्रभावाची दखल घेत तिला हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याचे आयोजकांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तिच्या कलात्मक प्रवासाने जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा दिल्याचेही या घोषणेत म्हटले आहे.