मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही नेहमीच्या आपल्या चाहत्यांना नवनवीन रुपात पहायला मिळते. तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकाही चाहत्यांना फार भावली होती. चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिले. नेहमी प्रमाणेच यावेळीदेखील तेजश्रीने वेगळेपण मुक्ताच्या अभिनयातून प्रेक्षकांना दाखवून दिले. परंतु आता प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकेला तेजश्री प्रधान रामराम देणार आहे. लोकप्रिय ठरत असलेल्या या मालिकेतून अचानक तेजश्री प्रधानची एक्झिट होण्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.