Tejashree Pradhan vs Shashank Ketkar: Who is Richer?
esakal
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सध्या वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत पहायला मिळतेय. या मालिकेतील तिचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. याआधी तेजश्री स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत पहायला मिळाली होती. परंतु तिच्या मालिकेतील अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना धक्का बसला. प्रेक्षकांनी तेजश्रीच्या प्रत्येक पात्रावर प्रेम केलय. तेजश्रीच्या जान्हवी, शुभ्रा आणि आता स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना हवहवसं वाटतं.