म्हणून तेजश्रीने सोडली 'प्रेमाची गोष्ट'? मालिका सोडल्यानंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणते- कधी कधी...

Tejashri Pradhan First Post After Exit From Premachi Gosht : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतीच 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली. आता तिची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये.
tejashri pradhan
tejashri pradhanesakal
Updated on

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिकाविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. 'होणार सून मी या घरची', 'अगं बाई सासूबाई' आणि आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र तिच्या एका निर्णयाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. तिने 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अचानक सोडली. त्यामुळे चाहते चिंतेत पडले. आता तिने केलेली पोस्टही सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती या पोस्टमध्ये नाराज असल्याचं दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com