

tejashree pradhan new movie
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. तिने 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून प्रेक्षकांच्यामनात स्थान निर्माण केलं. त्यानंतर तिने अनेक मालिका केल्या. तिची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिकादेखील प्रचंड गाजली. तिच्या प्रत्येक गोष्टीची चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. तेजश्रीदेखील चाहत्यांसोबत कायम जोडलेली राहते. आता अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केलीये. तेजश्री लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका २५ वर्षाने मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसतेय.