

TEJASHRI PRADHAN
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय. तिच्या हास्यावर अनेक चाहते फिदा आहेत. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली. त्यामुळेच तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसाद मिळतो. तिने 'होणार सून मी ह्या घरची' मधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका अर्ध्यातून सोडली होती. ज्यामुळे तिचे चाहते नाराज झालेले. मात्र आता तेजश्री पुनः एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेमध्ये समर आणि स्वानंदी यांचा विवाहाचा सिक्वेन्स सुरू आहे. मात्र अशातच तेजश्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून चाहत्यांनाही हसू फुटलंय.