'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका 2013 मध्ये प्रचंड गाजली. मालिकेतील कलाकारांना आजही त्याच नावानं ओळखलं जातं. इतके वर्ष होऊनही प्रेक्षक आजही मालिकेची आठवण काढतात. मालिकेतील जान्हवीचं मंगळसूत्र असो, की 'काहीही हा श्री' डायलॉग असो प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम दिलं.