तेजश्री प्रधानची बहीण पाहिली? अभिनेत्रीनं शेअर केलेले फोटो पाहून म्हणाल, 'अरे ही डिक्टो कॉपी-पेस्ट'

TEJASHRI PRADHAN SHARES PHOTOS WITH SISTER: 'वीण दोघातली ही तुटेना' फेम तेजश्री प्रधानने तिच्या बहिणी शलाका प्रधानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
TEJASHRI PRADHAN

TEJASHRI PRADHAN

esakal

Updated on

TEJASHRI PRADHAN FAMILY PHOTOS GO VIRAL: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने मालिका, सिनेमा यातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती वीण दोघातली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान तेजश्री सोशल मीडियावर सुद्धा चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच स्टोरीद्वारे तिचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु ती कुटुंबाविषयीची माहिती शेअर करणं शक्यतो टाळते. दरम्यान अशातच तेजश्रीनं सोशल मीडियावर बहिणीसोबतचे काही फोटो शेअर केलेत. ते फोटो पाहून तेजश्री सेम बहिणीसारखी दिसत असल्याचं कळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com