Tejaswini Lonari–Samadhan Sarvankar Wedding
esakal
Tejaswini Lonari Samadhan Sarvankar Wedding : मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाईचा सीजन सुरु आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकले आहेत. प्राजक्ता गायकवाड, सुरज चव्हाणसह अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान अशातच आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सुद्धा लग्नबंधनात अडकली आहे. शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.