TEJASHRI PRADHAN FRACTURE
esakal
TEJASHRI PRADHAN SHARES FOOT INJURY UPDATE: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयातून मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. तिचं शुभ्रा, जान्हवी, मुक्ता हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. आता ती स्वानंदीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अशातच तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक काळजी करणारी बातमी आहे. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.