THARALA TAR MAG
esakal
THARALA TAR MAG: 'ठरलं तर मग' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सायली विरुद्ध प्रिया असा ड्रामा सध्या घरात पहायला मिळतोय. मालिकेत सध्या प्रियाचं खरं रुप सगळ्यांसमोर आणण्यासाठी सायली-अर्जुन प्रयत्न करत असतात. त्यातच प्रियाची खरी ओळख बबली लोखंडे आहे हे सत्य दोघांना समजलेलं असतं. परंतु दोघांकडे तिच्याविरोधात कोणतेही पुरावे नसतात. त्यामुळे प्रिया आणि अधिराज एकत्र भेटतानाचा व्हिडिओ ते गुपचूप शूट करतात.