NEW ENTRY IN THARLA TAR MAG
esakal
THARLA TAR MAG TWIST: स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. सायली-अर्जुन, प्रिया यांचा अभिनयाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालय. दरम्यान अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. सध्या सायली आणि अर्जुन प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठी प्लॅन करताना पहायला मिळताय. प्रिया देखील त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्लॅन करुन त्यांचा अपघात घडवते. दोघांना जिवंत पाहून तिला धक्काच बसतो.