Tharla Tar Mag Shocking Twist
esakal
Tharla Tar Mag Serial: ठरलं तर मग मालिकेत सध्या नवे नवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीमध्ये सुद्धा ही मालिका नंबर वनवर आहे. मालिकेतील सतत येणारे ट्वीस्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अशातच आता मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे. अर्जुन सायली आणि प्रियाचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चक्क महिपत त्याची लपून मदत करताना पहायला मिळतय. प्रिया महिपतला फसवून तुरुंगातून बाहेर आलेली आहे. त्यामुळे महिपत प्रियाचा बदला घेण्यासाठी आणि तिला अडकवण्यासाठी अर्जुनची मदत करताना पहायला मिळतोय.