THARALA TAR MAG ENDING RUMOUR
esakal
Is Tharala Tar Mag ending? : 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनातील एक भाग झाली आहे. ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत अर्जुन-सायलीच्या जाळ्यात महिपत फसलेलं दाखवण्यात आलंय. तसंच त्याने '२२ वर्षांपूर्वी मीच अपघात केल्याचं' कबूल केलय. दरम्यान आता महासंगम एपिसोडमध्ये सायली-अर्जुन बाबूचा शोध घेतात. बाबूला पकडण्यातही त्यांना यश मिळतं.