Tharla Tar Mag Behind-the-Scenes Viral Video
esakal
Tharla Tar Mag BTS Viral Video: ठरलं तर मग मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत. गेल्या ३ वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अर्जुन सायली यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशातच आता मालिकेत नवीन ट्वीस्ट आलेलं पहायला मिळतय. महिपतसोबत प्रिया अन् नागराज सायली अर्जुनच्या जाळ्यात अडकणार असल्याचं दाखवण्यात आलय. सध्या सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो व्हायरल होतोय.