

marathi serial trp list
esakal
मराठी मालिकांचा टीआरपी हा सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतोय. ज्या मालिकेचा टीआरपी कमी ती मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते. तर ज्या मालिकेचा टीआरपी जास्त ती मालिका प्रेक्षक जास्त पाहतात. टीआरपीमध्ये कोणती मालिका सगळ्यात पुढे आहे, कोणत्या मालिकेचा टीआरपी कमी झालाय किंवा वाढलाय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. मालिकांच्या वेळेचादेखील त्यांच्या टीआरपीवर परिणाम होतो. आता मागच्या आठवड्याचा टीआरपीदेखील समोर आलाय आणि यात बऱ्याच मालिकांचं स्थान खाली वर झालंय. जे पाहून चाहत्यांना धक्का बसलाय.