

dharmendra LIFE STORY
ESAKAL
बॉलिवूडचे लाडके ही मॅन धर्मेंद्र आज काळाच्या पडद्याआड गेले. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृती सुधारणा होत नव्हती. अखेर आज २४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आज ते धरम पाजी म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य तेव्हा चर्चेत आलं जेव्हा ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्याशी लग्नही केलं. ते चार मुलांचे वडील होते. त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र या सगळ्या वादळात एक व्यक्ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती. ती म्हणजे धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर.