

Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा सध्या थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात सुरु आहे. अनेकांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण अजूनही अनेक मध्यमवर्गीय मराठी माणसांनी हा सिनेमा पाहिलेला नाही, त्यांना तो पाहता यावा यासाठी सिनेमाच्या प्राईम टाईम शोच्या तिकिटांचे दर कमी करावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आली आहे. सध्यातरी मुंबईतील एकाच चित्रपटगृहासाठी ही मागणी केलेली असली तरी त्याचं संपूर्ण महाराष्ट्रासाठीही विचार केला जाऊ शकतो.