Malvani dramatist loveraj Kambli passed away
Malvani dramatist loveraj Kambli passed awayesakal

'वस्त्रहरण'मधील 'गोप्या'ची एक्झिट; मालवणी नाट्यकर्मी लवराज कांबळींचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन

लवराज (loveraj Giridhar Kambli) यांच्या निधनामुळे मालवणी नाट्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Summary

लवराज यांनी रंगभूमीवर अनेक भूमिका केल्या. विशेषतः त्यांचा 'वस्त्रहरण'मधील गोप्या सर्वांच्याच लक्षात राहिला.

मालवण : रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र-नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (वय ६६) यांचे काल सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ज्येष्ठ नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी (Machindra Kambli) यांच्या अभिनयाने समृद्ध मराठी रंगभूमीवर इतिहास घडविणाऱ्या ‘वस्त्रहरण’ या नाटकातील ‘गोप्या’चे पात्र त्यांनी अजरामर केले होते.

‘वस्त्रहरण’मध्ये सुरुवातीला प्रॉम्प्टर आणि नंतरच्या काळात ''गोप्या'' या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने लोकप्रिय करून मालवणी आणि मराठी रसिकांच्या मनात ठसा उमटविणाऱ्या लवराज (loveraj Giridhar Kambli) यांच्या निधनामुळे मालवणी नाट्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाट्य क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Malvani dramatist loveraj Kambli passed away
Konkan Shimgotsav : ऐन 'शिमग्यात' वाऱ्यामुळे मासेमारीवर 'संक्रांत'; मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले

रेवंडी गावात प्राथमिक शिक्षण तर कांदळगाव ओझरच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई गाठली आणि छोटी मोठी नोकरी करताना त्यांनी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनच्या ‘वस्त्रहरण’ नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पर्दापण केले. भद्रकाली प्रोडक्शनच्या ‘पांडगो इलो बा इलो’, ‘घास रे रामा’, ‘करतलो तो भोगतलो’, ‘येवा कोकण आपलाच आसा’ या व इतर नाटकांमध्ये त्यांनी काम केले.

मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर गीतांजली प्रोडक्शन ही स्वतःची नाटक कंपनी सुरू केली. गीतांजली प्रोडक्शनद्वारे लवराज यांनी ‘येवा कोकण आपलाच आसा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले. लवराज कांबळी हे नेपथ्यकार अंकुश कांबळी यांचे सख्खे जुळे भाऊ तर रंगभूषाकार तारक कांबळी यांचे ते काका होत. त्यांच्यामागे एक मुलगा, सून असा परिवार आहे.

Malvani dramatist loveraj Kambli passed away
शिवसेनेची मतदारसंघावरील पकड ढिली? शिंदे गटाच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नाव नसल्याची चर्चा, भाजपच्या वाट्याला जागा

‘गोप्या’ सर्वांच्याच लक्षात

लवराज यांनी रंगभूमीवर अनेक भूमिका केल्या. विशेषतः त्यांचा 'वस्त्रहरण'मधील गोप्या सर्वांच्याच लक्षात राहिला. त्यांनी नेपथ्यमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी स्वतः अनेक नाटकांची निर्मिती केली. त्यांनी पेंटिंगमध्येसुद्धा लौकिक निर्माण केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com