Sangeet Mandarmala
Sangeet Mandarmala Sakal

Sangeet Mandarmala : ‘संगीत मंदारमाला’ नाटकाचे पुनरागमन

१२०० हून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘बसंत की बहार आयी’ ही नाट्यगीते अजरामर झाली. याच नाटकाचे आता नव्या संचात पुनरागमन झाले आहे.

Sangeet Mandarmala : विद्याधर गोखले लिखित आणि पं. राम मराठे यांचे संगीत व प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाने साठच्या दशकात मराठी संगीत रंगभूमीवर नवा इतिहास घडवला. १२०० हून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकातील ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘बसंत की बहार आयी’ ही नाट्यगीते अजरामर झाली. याच नाटकाचे आता नव्या संचात पुनरागमन झाले आहे.

पं. राम मराठे यांचे सुपुत्र पं. मुकुंद मराठे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. संगीतभूषण पं. राम मराठे फाऊंडेशन निर्मित आणि कलाभारतीच्या सहकार्याने आता व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. याचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन वीणा नाटेकर, संजय मराठे आणि मुकुंद मराठे यांनी केले असून ‘मंदार’ ही प्रमुख भूमिका पं. राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे साकारत आहेत.

विशेष म्हणजे पं. राम मराठे आणि विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षात या नाटकाचे पुनरागमन होत असल्याने ते अधिकच विशेष ठरले आहे. येत्या रविवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com