तीन वेळा ऑस्कर अवॉर्डसाठी नामांकन मिळालेला हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूज हा खतरनाक स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. तसंच त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा टॉमचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलय. मिशन इंपॉसिबलच्या आठव्या भागातील स्टंटसाठी त्याचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आलय.