हॉलिवूड अॅक्टर टॉम क्रूझ याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेला चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल- द फायनल रेकनिंग' शनिवारी भारतात प्रदर्शित करण्यात आला. भारतात मिशन इम्पॉसिबलचे लाखो चाहते आहेत. भारतात या चित्रपटाची क्रेझ जास्त असल्यामुळे भारतात सात दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशीच या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला कमावलाय.