Bollywood Update: अनुराग कश्यप यांचा 'निशानची'चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित!

Nishanchi movie trailer launch news and release updates: अ‍ॅमेझॉन MGM स्टुडिओज इंडिया आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप – जे त्यांच्या बोल्ड आणि दमदार स्टोरीटेलिंगसाठी ओळखले जातात – ३ सप्टेंबर रोजी अधिकृत ट्रेलर लाँच करणार आहेत. हा ट्रेलर प्रेक्षकांना अ‍ॅक्शन आणि ड्रामाचा एक हाय-ऑक्टेन मिक्स देणार आहे.
Bollywood Update: अनुराग कश्यप यांचा 'निशानची'चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित!
Sakal
Updated on

याचा अर्थ उद्यापासून खरा सिनेमॅटिक धमाका सुरू होणार आहे! "निशानची"च्या टीझरने आधीच या चित्रपटाची जगाला पहिली झलक दाखवली आहे आणि संगीताने तर आधीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्रेक्षक ट्रेलरच्या आणखी एका झलकसाठी उत्सुक आहेत. चित्रपटातील दमदार डायलॉग्स लवकरच सगळ्यांचे आवडते होणार, याबद्दल शंका नाही. तसेच एक फ्रेश आणि टॅलेंटेड कास्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com