Trisha Thosar Wins National Award in Saree | Viral Video
esakal
71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज कलाकरांचा सन्मान करण्यात आला. सिनेमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकरांचा राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याची मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.