Child Artist Trisha Thosar Wins National Award video viral
esakal
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन इथं पार पडला. या सोहळ्यात कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नाळ सिनेमा सुपरहिट ठरला. यातील बाल कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु या सगळ्यात चर्चेची ठरली ती त्रिशा ठोसर. त्रिशाने वयाच्या 6 व्या वर्षी आत्मविश्वासाने मंचावर जात पुरस्कार स्विकारला. या पुरस्कार सोहळ्यातील त्रिशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.