झी मराठी वाहिनीवर 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रचंड गाजली होती. चाहत्यांनी मालिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं. अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी प्रेक्षकांना फार भावली. ही मालिका जवळपास 4 वर्ष चालली. या मालिकेतील इतर कलाकारांवर सुद्धा प्रेक्षकांनी प्रेम केलं. आज देखील मालिकेतील कलाकारांना त्याच पात्राच्या नावाने बाहेर ओळखलं जातं.