

Laughter and applause in the studio over the poem recited by Sunil Grover
sakal
मुंबई : कडक शिस्त, पारदर्शक कारभार आणि गैरप्रकारांवर थेट हातोडा चालवणारे महाराष्ट्रातील डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाची भुरळ आता थेट बॉलिवूडलाही पडली आहे. सध्या नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये अष्टपैलू विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरने तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांवर एक अफलातून आणि खुमासदार कविता सादर केली आहे. सुनील ग्रोव्हरच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून यावर भरभरून कौतुक केले जात आहे.