बापरे! 'बालवीर' इतका मोठा झाला; नेपाळमधील मंदिरात पार पडला साखरपुडा, शेअर केला होणाऱ्या पत्नीचा फोटो

Dev Joshi Engagement: 'बालवीर' फेम अभिनेता देव जोशी याने नुकताच साखरपुडा केला. त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केलाय.
dev joshi
dev joshiesakal
Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक मराठी आणि हिंदी कलाकार विवाहबंधनात अडकले. काही कलाकारांनी लग्नगाठ बांधली. तर काहींनी आपल्या जोडीदारावरील प्रेमाची कबुली दिली. आता अशाच एका अभिनेत्याने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. लवकरच हा अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. हा अभिनेता आहे 'बालवीर' मालिकेतून घराघरात पोहोचलेला देव जोशी. देव जोशीने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com