
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील 'अक्षरा' म्हणजेच अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत असते. ती कर्करोगाशी झुंज देत आहे. त्यातच आता हिनाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न केले आहे. हिना आणि रॉकीने खूप गुपचूप लग्न केले. आता तिने चाहत्यांसाठी तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.