TV ACTRESS KAJAL CHAUHAN
ESAKAL
KAJAL CHAUHAN LATEST BOLLYWOOD MOVIE NEWS: छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर, टीव्ही अभिनेत्री काजल चौहान आता मोठ्या पडद्यावर झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक राजीव श्यामलाल सोनी यांच्या 'दिल दिवाना हो गया' चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत असून, नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यात तिचे हे नवीन रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले.