
बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण झा यांच्यावर पहिली पत्नी रंजना झा यांनी गंभीर आरोप केले आहेत. उदित नारायण यांनी मला घरातून बाहेर काढलं आणि दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत असं रंजना झा यांनी म्हटलंय. सुपौल कौटुंबिक न्यायालयात त्यांनी य़ा प्रकरणी तक्रार दाखल केलीय. रंजना झा यांनी उदित नारायण यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले आहेत.