
उमेश कामत आणि प्रिया बापटची जोडी बिन लग्नाची गोष्ट या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नातेसंबंध आणि लग्नाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.
प्रिया म्हणाली की ते प्रेमात पडल्यावर लगेच लग्न केलेलं नाही; लग्नाआधी ७-८ वर्षे ते एकत्र होते पण लिव्ह-इनमध्ये राहत नव्हते, त्यांनी निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला.