

Marathi Entertainment News : 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी दिशा देऊन हजारो रुग्णांना उपचार व आपल्या मौलिक मार्गदर्शनाने 'ताठ कण्याने' जगायला शिकवणारे जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी मानवतेच्या तत्वाचा स्वीकार करत आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. लाखो रूग्णांना वेदनामुक्त करणारी एक विशेष सर्जरी शोधून काढताना त्यांनी घेतलेले कष्ट, त्या संशोधनावर शंका व्यक्त केली गेली तेव्हाचा संघर्ष आणि आपल्या रूग्णांच्याच मदतीने त्यांनी त्यावर जिद्दीने केलेली मात यावर आधारित 'ताठ कणा' हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.