बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

DWIDHA MOVIE RELEASE DATE: नेटफ्लिक्स फेम संगीतकाराची साथ! 'द्विधा' चित्रपटातून उलगडणार बाप-लेकीचा हळवा प्रवास; कलाकारांची तगडी फळी!
DWIDHA

DWIDHA

ESAKAL

Updated on

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com