
Upcoming Marathi Movie Gondhal
Marathi Entetrainment News : महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यांना मोठ्या पडद्यावर नव्या उंचीवर नेणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र या पोस्टरइतकीच चर्चेचा विषय ठरली आहे, या चित्रपटाची भव्य टेक्निकल टीम. खरंतर, एका परंपरेची गोष्ट जेव्हा मोठ्या पडद्यावर आणायची ठरते, तेव्हा त्या मागे असते एक ताकदीची स्वप्नवत टीम. 'गोंधळ'लाही अशीच साथ लाभली आहे.