

Marathi News : मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं वेगळंच स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडतेय ती म्हणजे ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’! नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.