
Marathi Entertainment News : धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा २' या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग म्हणजेच 'ये रे ये रे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या १८ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
वैशिष्ट्य म्हणजे, बॅालिवूडला एकाहून एक जबरदस्त चित्रपट देणारे धर्मा प्रॉडक्शन्स आणि एव्हीके पिक्चर्स पहिल्यांदाच एकत्र येत असून धर्मा प्रॉडक्शन्स या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे आधीच भव्य असणाऱ्या या चित्रपटाची भव्यता आता आणखीनच वाढणार आहे.