बाबा, तुला आयुष्यभर पश्चाताप झाला असता का? 'अ‍ॅनिमल' पाहिल्यावर उपेंद्र लिमयेच्या मुलाने विचारलेला प्रश्न; अभिनेता म्हणाला-

Upendra Limaye Animal Movie Role | Actor Reveals Son's Question About His Character: लोकप्रिय मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी मुलाने 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना काय विचारलं याबद्दल मुलाखतीत सांगितलंय.
upendra limaye son reaction on animal movie

upendra limaye son reaction on animal movie

esakal

Updated on: 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटात जबरदस्त भूमिका केली होती. 'अ‍ॅनिमल' जितका गाजला तितकीच उपेंद्र यांची भूमिकाही गाजली. रणबीर कपूरसोबत त्यांनी साकारलेल्या फ्रेडीचं देखील जोरदार कौतुक झालं. त्यांची फ्रेडी पाटीलची भूमिका सुपरहिट ठरली. मात्र या भूमिकेसाठी उपेंद्र यांनी सुरुवातीला नकार दिलेला. संदीप रेड्डी वांगाच्या टीमकडून त्यांना दोनवेळा फोन करण्यात आला मात्र त्यांनी नकार दिला. अखेर संदीप रेड्डी वांगा यांनी स्वतः उपेंद्र यांची भेट घेत त्यांना कथा सांगितली. त्यानंतर त्यांनी चित्रपटासाठी होकार कळवला. मात्र हा चित्रपट पाहिल्यावर उपेंद्र यांचा मुलगा काय म्हणाला तुम्हाला माहितीये का?

Loading content, please wait...