

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट
esakal
मराठी सिनेविश्वात आज एक धक्कादायक बातमी समोर येतेय. लोकप्रिय मराठी जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी नुकतीच ते दोघे घटस्फोट घेत असल्याचं सांगितलंय. त्यांनी पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. लग्नानंतर तब्बल १५ वर्षांनी ते दोघे वेगळे झालेत. हा प्रेक्षकांना खूप मोठा धक्का आहे. मात्र गेले काही वर्ष त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांमागचं कारण काय होतं?