

URMILA KANETKAR CRYPTIC POST
esakal
URMILA KANTEKAR KARMA POST: गेल्या महिन्याभरात मराठी इंडस्ट्रीत जणू वादळ आलंय. पॉवर कपल म्हणवल्या अनेक कलाकारांचे संसार पत्त्याच्या बंगल्यासारखे मोडलेत. जाणून मराठी इंडस्ट्रीमध्ये घटस्फोट घेण्याचा ट्रेण्ड आलाय. काही दिवसांपूर्वीच मराठीतली हिट म्हणवली जाणारी जोडी तुटली. ती म्हणजे आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर. त्यांनी अचानक आपण घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. ज्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांच्यातील दुराव्याची कल्पना काही प्रमाणात चाहत्यांना होती. त्यांच्या संसारातील मतभेदाबद्दल अनेकदा सोशल मीडियावर बोललं जात होतं. आता घटस्फोटाच्या २१ दिवसांनंतर उर्मिलाने इंस्टाग्रामवर एक सूचक पोस्ट शेअर केलीये.